Thursday, 10 November 2011

गरज आणि विचार..!!               

          संपूर्ण जगभर ११.११.११ चा मुहुर्त कोणत्या ना कोणत्या कारणासाठी  गाठण्यासाठी  नवीन योजना, संकल्प पूर्ण करण्यासाठीची धडपड सुरु आहे. कोणी लग्नाचा मुहुर्त ,वास्तुशांत,वाढदिवस व उदघाटनासारखे  कार्यक्रम आज करत आहेत. तर बच्चन फॅमिलीने ऐश्वर्याचे बाळ आणायचे ठरवले. यासाठी सट्टाबाजार  तेजीत झाला. जोतिष भविष्य वर्तविताहेत. कोणी हा दिवस शुभ तर कोणी अशुभ मानताहेत. पण मी मात्र सकारात्मक विचार करणारी,नव्या पिढीशी,नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात असणारी एक मध्यमवयीन महिला तरुनाईशी, महिलांशी व पालकांशी संवाद साधण्यासाठी आज ब्लॉग सुरु करतेय. इतकच!     
         नुकतेच वर्तमानपात्रत वाचले की, मुला-मुलींचा जन्मा,वाढदिवस आपण कधीच विसरत नाही. मग त्यासाठी ११.११.११ घ्येण्याची गरज काय? तसा पाहता अनेक गोष्टींची गरज नसतेच पण भारतीय संस्कृतीत, आपल्या धर्मात विनाकारण अनेक गोष्टी गरजेच्या आपणच बनवल्या आहेत याचा आपण विचार करतो का? केवळ रुढी, परंपरा म्हणून कित्येक गोष्टी पाळल्या जातात. 
         उदा.शंकराच्या पिंडीवर १ लाख बेल वहाणे. १६ सोमवार उपवास करणे व उद्यापन करणे त्यासाठी हजारो रुपये खर्चा करून जेवनावली व आहेर करणे.
         शारीरिक व मानसिक व्याधी व समस्यांसाठी ज्योतिष, ब्राह्मण, बाहेरचे बघणारे इ. चा आधार घेणे. डॉक्टर व कौंसिलरची मदत  नाकारणे. अशा परिस्थितीतून अनेक जण जात आहेत. 
         वास्तविक परिस्थितीचा गुलाम होण्याऐवजी तिच्यावर मात करण्यात खरा पुरुषार्थ आहे.

( शैलजा मोळक )




    
  

1 comment:

  1. ताई !! एकदम सही !!
    आपले विचार समस्त महिलांपर्यंत पोहचले पाहिजे.
    आपण व्याख्यानाच्या माध्यमातून ते पोचावा ..हि विनंती !!
    जय जिजाऊ ! जय शिवराय !!
    ब्लॉग सुरु केल्याबद्दल अभिनंदन !!!
    www.sunilchaudhari-balirajya.blogspot.com

    ReplyDelete